लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दाजीपूर चेक नाक्यावर गोवा बनावटीचे 26 हजार रुपयांचे विदेशी मद्य जप्त

0
690

कौलव प्रतिनिधी(निरंजन पाटील)
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारलेल्या दाजीपूर (ता.राधानगरी) येथील चेक पोस्ट नाक्यावर गोवा बनावटीचे विदेशी मद्य विशेष पथकाने पकडले.राज्य उत्पादन शुल्क विभागाने विवेकानंद मारुती खंदारे याला सव्वीस हजार रुपये किमतीच्या मद्य साठ्यासह ताब्यात घेतले आहे.
सहायक निवडणूक निर्णय अधिकारी संपत खिल्लारी,राधानगरी तहसीलदार मीना निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली गटविकास अधिकारी डॉ.उदय पाटील,श्रावण सलाम,शरद आडमुठे यांच्या निवडणुक दक्षता पथक दाजीपूर येथे गस्त घालत असताना विवेकानंद मारुती खंदारे (जवाहर नगर कोल्हापूर)यांच्याकडे सव्वीस हजार रुपये किमतीचे चाळीस बॉटल विदेशी मद्य बॅगेत आढळले.निवडणूक पथकाने उत्पादन शुल्क विभाग यांच्या सहकार्याने विवेकानंद खंदारे याला मुद्देमालासह ताब्यात घेतले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here