गारगोटी येथे नवविवाहितेची आत्महत्या; नातेवाईकांकडून पतीच्या घराची तोडफोड

0
3432

गारगोटी (प्रतिनिधी) : येथील चव्हाण गल्लीतील नवविवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून गळफास लावून आत्महत्या केली. पूजा अशोक चव्हाण वय(२१)असे तिचे नाव आहे. याप्रकरणी भुदरगड पोलीस ठाण्यात रात्री उशिरा नोंद झाली आहे. चौडाळ (ता.कागल) येथील नामदेव ज्ञानू पाटील यांची मुलगी पुजा हिचा विवाह गारगोटी चव्हाण गल्ली येथील अशोक शिवाजी चव्हाण याच्याशी जुलै महिन्यात झाला होता. अशोकचा मंडप ,डेकोरेशनचा व्यवसाय आहे. सासरा शिवाजी, सासू अंजना, नणंद सोनाली हे मंडप डेकोरेशन व्यवसाय आणि १० तोळे सोने आणावे यासाठी तिचा वारंवार मानसिक व शारीरिक छळ होत असल्याचे सांगितले. सासरची मंडळी पूजाला वेगळे राहण्यासाठी वारंवार दबाब टाकत होते. मंगळवारी तिला पुन्हा सासरच्या मंडळींनी त्रास दिला व माहेरी निघून जाण्यास सांगितले. यामुळे पूजा अवस्थ झाली होती. यातूनच तिने गळफास लावून आत्महत्या केली. पुजाचे वडील नामदेव पाटील यांनी भुदरगड पोलीस ठाण्यात सासू, सासरा, नणंद विरुद्ध पैसे व सोन्यासाठी पुजाचा छळ केला व तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल फिर्याद दिली आहे. ग्रामीण रुग्णालय गारगोटी येथे माहेरच्या लोकांनी पूजाच्या नवरा, सासू, सासरा ,नणंद यांना आमच्या ताब्यात द्या यासाठी नातेवाईकांनी मोठा गोधळ घातला. नातेवाईकांनी पूजाच्या नवऱ्याच्या घरात घुसून प्रापंचिक साहित्याची तोडफोड केली. पुजाचा मृतदेह ताब्यात घेण्यात नातेवाईकांनी नकार दिला. यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here