सोशल मीडियावर भाजप आणि राष्ट्रवादीची जुगलबंदी

0
218

\मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर होत आहेत. सभा आणि मेळाव्यातून आरोपाच्या फैरी झडत आहेत. आता सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जुंपली आहे. सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या भाजपने व्यंगचित्राच्या माध्यमातून विरोधकांवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर एक व्यंगचित्र काढले होते. रणछोडदास काका, बारामतीचा पोपट आणि भविष्य या शिर्षकाखाली राज आणि पवारांचे व्यंगचित्र होते. यात शरद पवार हे राजला म्हणतात, राज तुझं काहीच भविष्य दिसत नाही. त्याला राज, पवार काकांकडेही काहीच काम उरलेले दिसत नाही असे संवाद दाखवण्यात आले होते. या व्यंगचित्राला राष्ट्रवादीने देखील व्यंगचित्राद्वारेच उत्तर दिले आहे. पंतप्रधान मोदी हे शरद पवारांचा हात धरुन चालताना दाखवण्यात आले आहे. यात मोदी म्हणतात, पवारांनीच राजकारणात मला बोट धरुन चालायला शिकवलं असे संवाद दाखवले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here