भाजप उमेदवारांची पहिली यादी १६ मार्चला

0
33

मुंबई : २०१९च्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपची पहिली यादी १६ मार्चला जाहीर होणार आहे अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली. या पहिल्या यादीत १७/१८ जागांचे उमेदवार जाहीर होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. तर अजूनही ५/६ जागांच्या नावांवर अजूनही तिढा कायम आहे. त्यामुळे भाजपच्या या पहिल्या यादीत कोणत्या दिग्गज उमेदवारांची नावं पुढे येतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपा नवीन चेहऱ्यांना संधी देणार आहे. सोलापूर, गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नांदेड, हिंगोली आदी लोकसभा मतदारसंघात नवीन चेहर्‍यांना संधी देण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. त्यामुळे काही विद्यमान खासदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक होणार असून राज्यातील उमेदवारांच्या नावावर चर्चा होणार आहे. उमेदवारांची निवड करण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील लक्ष घातलं आहे. त्यामुळे अनेक नवीन चेहरे हे भाजपच्या वतीनं लोकसभेच्या रिंगणात उतरणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here