‘दहशतवाद प्रत्युत्तरात मनमोहन सिंग नव्हे तर नरेंद्र मोदीच सरस’

0
116

नवी दिल्ली : दहशतवाद्यांना आणि दहशतवादी कारवायांना उत्तर देण्याच्या बाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग सरस आहेत असं वक्तव्य दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांनी केलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ माजली आहे. कारण यूपीएच्याच पंतप्रधानांच्या विरोधात जाणारं हे त्यांचं वक्तव्य आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शीला दीक्षित यांनी हे उत्तर दिले.२६/११ चा हल्ला जेव्हा मुंबईवर झाला त्यावेळी मनमोहन सरकारने तेवढी कठोर कारवाई केली नाही जेवढी पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यानंतर दिले, असं म्हणत शीला दीक्षित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुती केली असली तरीही मोदींनी या कारवाईचं राजकारण केल्याचीही टीका त्यांनी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here