भारताला हवा मोफत व्हिसा; पाकिस्तानकडे मागणी

0
202

नवी दिल्ली : भारत पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचं वातावरण आहे. त्यात आता भारताने पाकिस्तानकडे एक मागणी केली आहे. करतारपूर साहिब यात्रेसाठी जाणाऱ्या भाविकांना व्हिसा शिवाय यात्रा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे. अटारीमध्ये झालेल्या बैठकीनंतर भारतीय प्रतिनिधींनी मीडियाला सांगितले की, दिवसाला 5000 भाविकांना दर्शन घेण्याची परवानगी देण्यात यावी अशीही मागणी भारताकडून करण्यात आली आहे. गुरुद्वारा करतारपूर साहिबसाठी कॉरिडोर तयार करण्यासाठी गुरुवारी अटारीमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये सचिव स्तरावर पहिली बैठक झाली. या बैठकीमध्ये व्हिसासंबंधी काही मागण्या भारताकडून करण्यात आल्या. तर यासंबंधी पुढील बैठक ही 2 एप्रिलला वाघामध्ये आयोजित केली आहे. या प्रकरणात दोन्ही देशांच्या बैठकीच्या आधी पाकिस्तानने भारताला 59 पानांचं एक दस्तावेज पाठवलं होतं. त्यात पाकिस्तानकडून 14 मागण्यात करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता या मागण्यांवर दोन्ही देशांची सहमती होणार का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here