नागपूरात गुरू-शिष्यामध्ये होणार लढत?

0
147

नागपूर : नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांना डावलून नाना पटोले यांना उमेदवारी दिलीय. त्यामुळे त्यांचा सामना भाजपचे दिग्गज नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी होणार आहे.पटोले हे मुळचे काँग्रेसचेच होते. गडकरींनी त्यांना भाजपध्ये आणले. २०१४ मध्ये ते निवडूनही आले होते. गडकरी समर्थक अशी त्यांची प्रतिमा होती. मात्र नंतर मोदींशी बिनसल्याने त्यांनी भाजपला राम राम केला आणि पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. आता त्यांची गाठ कधी काळी गुरू असलेल्या गडकरी यांच्याशी होणार आहे. माजी खासदार नाना पटोले यांना नागपूर लोकसभा मतदार संघातून उमेदवारी मिळाल्याबद्दल गडकरींनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. नाना पटोले माझे मित्र आहेत, माझा त्यांना आशीर्वाद आहे असं गडकरी यांनी सांगितलं. मी कुणावरंही व्यक्तिगत टीका करणार नाही, मी केलेल्या कामावर मी मतं मागणार अशी प्रतिक्रियाही गडकरींनी व्यक्त केली. माझे तिकिट अद्याप निश्चित नाही पण पक्षाने उमेदवारी दिली तर मी यावेळेस मागच्या वर्षी पेक्षा जास्त मतांनी निवडून येईल, असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला. पक्षाने तिकीट दिल्यास येत्या 25 तारखेला अर्ज भरणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here