मौनी विद्यापीठात १९ मार्चला पदवीदान समारंभ

0
342

गारगोटी : प्रतिनिधी मौनी विद्यापीठाच्या कर्मवीर हिरे महाविद्यालय व आचार्य जावडेकर शिक्षणशास्त्र महाविद्यालयातील पदवीधर विद्यार्थ्यांचा मंगळवारी (दि. १९) पदवीदान समारंभ होत आहे. येथील महात्मा फुले सदनात सकाळी दहा वाजता समारंभास प्रारंभ होईल, अशी माहिती मौनी विद्यापीठाचे संचालक प्राचार्य डॉ. आर. डी. बेलेकर यांनी दिली. महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या नियमानुसार व शिवाजी विद्यापीठाच्या आदेशानुसार संलग्न महाविद्यालयात हा पदवीदान समारंभ आयोजित केल्याचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक सल्लागार डॉ. डी. आर. मोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. मौनी विद्यापीठाच्या विश्वस्त सौ. शालिनीताई देसाई अध्यक्षस्थान भूषवतील. ज्यांनी विद्यापीठाकडे पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल केलेले आहेत. त्यांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे. पदवीदान समारंभानंतर कर्मवीर हिरे कला, वाणिज्य, विज्ञान व शिक्षणशास्त्र महाविद्यालयातर्फे विद्यार्थी-पालक मेळावा आयोजित केला असल्याचे प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here