अतिरेक्यांनी पुलवामामधील सैनिकाला घराजवळच घातल्या गोळ्या

0
423

श्रीनगर : काश्मीर खोऱ्यातला हिंसाचार सुरूच आहे. दक्षिण काश्मीरमध्ये एका २५ वर्षीय सैनिकाला त्याच्या घराजवळच गोळ्या घालून ठार करण्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुन्हा एकदा पुलवामा जिल्ह्यातच ही घटना घडली असल्याची बातमी ग्लोबल न्यूज सर्व्हिसेसने दिली आहे.
जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्री रेजिमेंटचा जवान आशिक हुसेन याला काही संशयित अतिरेक्यांनी मारलं. हल्लेखोर तोंडावर रुमाल बांधून आल्याने ओळख पटलेली नाही. पुलवामा जिल्ह्यात पिंगलीना गावाच्या नाईक दक्षिण काश्मीरमध्ये एका २५ वर्षीय सैनिकाला त्याच्या घराजवळच गोळ्या घालून ठार करण्याची भयंकर घटना समोर आली आहे. मोहल्ल्यात हा प्रकार घडला. जवानाच्या घराबाहेरच हल्लेखोरांनी त्याला मारलं. पोलिसांनी या घटनेला दुजोरा दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here