मावळ लोकसभेच्या उमेदवारीवर शरद पवार यांची ‘गुगली’

0
716

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपले नातू पार्थ पवार यांच्या मावळ लोकसभा मतदारसंघातून उमेदवारीवर अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. अध्यक्ष शरद पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील बूथप्रमुखांबरोबर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी मावळ मतदार संघातून आलेल्या एका कार्यकर्त्याने पार्थ पवार यांना १०० टक्के निवडून आणण्यासाठी मेहनत घेणार आहोत असे शरद पवार यांना सांगितले. त्यावर पवार यांनी उमेदवार कोण याची यादी दोन तीन दिवसात अध्यक्ष जाहीर करतील. पार्थ पवार यांचे नाव त्यांनी घेतले नाही. मावळ लोकसभेच्या उमेदवारीवर शरद पवार यांनी गुगली टाकली आहे. शरद पवार म्हणाले की, सोशल मीडियावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे. खोटी बातमी आल्यानंतर खोडली पाहिजे. त्याला सोशल मीडियातून उत्तर दिलं गेलं पाहिजे. हे सर्व करत असताना कायद्याच्या चौकटीत राहूनच करा असे देखील पवार म्हणाले. पार्थ पवार यांना मावळ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्याचे संकेत दिल्यानंतर पार्थ हे सध्या मावळ परिसरात स्थानिक नेत्यांच्या गाठीभेटी घेत असून त्यांनी एकप्रकारे प्रचारच सुरू केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here