जमीन घोटाळ्यात मिसेस वाड्रांचंही नाव : स्मृती इराणी

0
137

नवी दिल्ली : जमीन घोटाळ्यावरून केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप केले आहेत. बुधवारी (13 मार्च) झालेल्या पत्रकार परिषदेत जमीन घोटाळ्यात राहुल गांधी, रॉबर्ट वाड्रा आणि श्रीमती वाड्रा यांच्याही नावाचा समावेश आहे, असा गंभीर आरोप स्मृती इराणी यांनी केला आहे. भाजपकडून प्रियांका गांधीवर पहिल्यांदाच थेट हल्ला करण्यात आला आहे. दुसरीकडे, स्मृती इराणींनी म्हटलं की, भाऊजींसोबत (रॉबर्ट वाड्रा)मेहुण्याचाही भ्रष्टाचारात समावेश आहे. राहुल गांधी हाच भ्रष्टाचाराचा चेहरा आहे, रॉबर्ट वाड्रा फक्त भ्रष्टाचाराचा मुखवटा आहे. यावेळेस इराणींनी काँग्रेसवर फॅमिली पॅकेज भ्रष्टाचार करण्याचाही धक्कादायक आरोप केला. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांची कालच पहिली सभा गुजरातमध्ये झाली. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर चौफेर टीका केली होती. त्यानंतर आज लगेचच भाजपनं पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसला टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here