काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी मुलांची काळजी घ्यावी! : आव्हाड

0
180

मुंबई : ‘महाराष्ट्रात मुलं पळवणारी टोळी सक्रिय झाली आहे. सर्वांनी, विशेषतः काँग्रेस-राष्ट्रवादीतील पालकांनी आपल्या मुलांची काळजी घ्यावी ! -जनहितार्थ जारी,’ असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. काँग्रेसचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील सुपुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी भाजपवर अशी टीका केली आहे. सुजय विखे पाटील यांनी अखेर मंगळवारी (12 मार्च) भाजपमध्ये प्रवेश केला आहे. सुजय विखे पाटील हे अहमदनगरमधून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. परंतु, नगरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहे. सुरुवातील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा काँग्रेसला देण्याची तयारी दर्शवली होती. परंतु, पवारांनी नंतर यू-टर्न घेतला. त्यामुळे सुजय विखे पाटलांच्या निवडणूक लढवण्याबाबत उलटसुलट चर्चा सुरु होती. भाजपमधून तिकीट मिळावं यासाठी सुजय विखे पाटील प्रयत्नशील होते. यासंदर्भात, भाजपचे गिरीश महाजन आणि सुजय विखे यांच्यामध्ये नुकतीच बैठकही झाली होती आणि अखेर आज मंगळवारी सुजय विखे पाटलांनी यान भाजपमध्ये प्रवेश केला. राधाकृष्ण विखे पाटील हेविरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देतील, अशा चर्चा होती. राजीनामा देण्याचा माझा विचार नाही, असं राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. ‘सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाबाबत काँग्रेसच्या दिल्ली हायकमांडला कल्पना दिली आहे. मी काँग्रेस पक्षातच असणार आहे आणि पक्ष सांगेल तिच भूमिका घेणार,’ अशी माहिती राधाकृष्ण विखेंनी दिली. मुलगा सुजयने भाजपमध्ये प्रवेश केल्याने राधाकृष्ण विखे पाटलांची चांगलीच अडचण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here