राधानगरी मतदारसंघात लोकसभेला कोण मताधिक्य घेणार?

0
2138

गारगोटी (नितीन बोटे) : कोल्हापूर लोकसभेसाठी आघाडीचे विद्यमान खासदार धनंजय महाडिक विरुद्ध युतीचे संजय मंडलिक अशीच लढत पाहायला मिळणार आहे .मागील 20 14 सालच्या लोक्स लोकसभेला राधानगरी विधानसभा मतदार संघात विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना 1,17,292 तर विरोधी संजय मंडलिक यांना,93,004 मतदान या मतदार संघात मिळाले होते.या मतदार संघामध्ये 2014 ला विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना 24 हजार 288 मतांचे मताधिक्य दिले होते. या मतदार संघात अनेक नेत्याचे गट कार्यरत आहेत .मतदार संघ गटातटात विभागला गेल्याने लोकसभेच्या उमेदवारांना सर्व गटनेत्याची मर्जी सांभाळावी लागणार आहे.राज्यांचे नेते महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचा हा घरचा मतदार संघ असल्याने त्यांना शिवसेनेचा उमेदवार विजयी करण्यासाठी शर्थीने प्रयत्न करावे लागणार आहेत मात्र त्यांची महाडिक परिवाराशी असलेला राजकीय सलोखा धनंजय महाडिक यांना मदत करणार की युतीचे उमेदवार संजय मंडलीक यांना हे निवडणूक निकालानंतर कळणार आहे. राधानगरी तालुक्यात काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार पी एन पाटील, राष्ट्वादीचे जिल्हाध्यक्ष ए वाय पाटील, माजी आमदार नामदेवराव भोईटे, भोगावतीचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील,गोकुळ संचालक अरुण डोगळे, पी डी धुदरे हे खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी राहतील तर भोगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिव चरापले,बिद्रीचे माजी उपाध्यक्ष विजयसिह मोरे हे सतेज पाटील यांचे नेतृत्व मानत आहेत यामुळे ते संजय मंडलिक यांच्या पाठीशी राहतील. भुदरगड तालुक्यात आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी माजी आमदार के पी पाटील, जि प सदस्य जीवनदादा पाटील, बिद्रीचे संचालक मधुकर देसाई, गोकुळ संचालक विलास कांबळे, युतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यासाठी सर्व ताकद आमदार प्रकाश अबीटकर लावतील, माजी आमदार दिनकरराव जाधव यांचे पुत्र विधानसभा लढवण्याची तयारी करत आहेत ते सतेज पाटील यांचे नेतृत्व मानतात ,तालुका अध्यक्ष शामराव देसाई ,युवक नेते सचिन घोरपडे सतेज पाटील समर्थक आहेत संजय मंडलिक यांच्या पाठीशी राहण्याची शक्यता जास्त आहे .माजी आमदार बजरंग देसाई यांचे पुत्र राहुल देसाई यांनी भाजप प्रवेश केला आहे .ते विधानसभा लढण्याची तयारी करत असल्याने त्याची गोची झाली आहे.गोकुळ संचालक धैर्यशील देसाई यांचे व धनंजय महाडिक यांचे सबंध जवळचे असल्याने ते महाडिक यांच्या पाठीशी राहतील. कोकण केसरी व बिद्रीचे माजी संचालक के जी नांदेकर हे कोणाला पाठींबा देतात पहावे लागेल.राधनगरी मतदार संघातील गटातटाच्या राजकारणात मतदार राजा कोणास पाठींबा देणार ,विधानसभेसाठी असलेली इच्छुकांची भाऊगद्दी ही लोकसभेच्या उमेदवारांची डोकेदुखी ठरलेली आहे .यावेळेही लोकसभेला खासदार धनंजय महाडिक यांच्या पाठीशी हा मतदार संघ राहणार की युतीचे संजय मंडलिक यांच्या पारड्यात मताधिक्य देणार एकूणच पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील ,आमदार प्रकाश अबीटकर यांची यावेळी कसोटी लागलेली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here