काँग्रेसशी आघाडी नाही : प्रकाश आंबेडकर

0
144

अकोला : बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसबरोबरील संभाव्य आघाडी तोडल्याची घोषणा मंगळवारी केली. येत्या १५ तारखेला राज्यातील सर्व ४८ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. काँग्रेसबरोबरचे सर्व प्रस्ताव संपले, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी त्यांनी सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या उमेदवारीमुळे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे. प्रकाश आंबेडकर हे अकोला येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. येत्या १५ तारखेला बहुजन वंचित आघाडीचे सर्वच्या सर्व ४८ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल.आमची भाजपा-शिवसेनेविरोधात लढाई सुरु असून राजू शेट्टींशी आमचा काही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here