फायर ऑफिसर ते रसवंती ,उच्चशिक्षित तरुणाचा निर्णय

0
465

औरंगाबाद – एका मोठ्या कंपनीत फायर ऑफिसर म्हणून काम करणाऱ्या उच्चशिक्षित तरुणाने उन्हाळा सुरू होताच नोकरी सोडून रसवंती टाकली आहे. नोकरी करण्यापेक्षा या चार महिन्यांच्या उद्योगातून भांडवल उभे करून पुढे हॉटेल टाकण्याचा मानस त्याने ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

नुकत्याच तापू लागलेल्या दुपारी अदालत रोडवर भरत साळुंके या तरुणाच्या रसवंतीत मात्र गर्दी असते. बांबू विकत आणून त्यापासून उभारलेल्या आकर्षक रसवंतीत चरकातून ऊस पिळणारा भरत एका कंपनीत चार वर्षे फायर ऑफिसर होता, हे कुणाला सांगूनही खरे वाटणार नाही. बीड जिल्ह्यातील एका लहानशा खेड्यातून आलेल्या या तरुणाने फायर इंजिनिअरिंग ॲण्ड सेफ्टी मॅनेजमेंटची पदवी मिळविली आहे. त्यानंतर चार-पाच वर्षांपासून नोकरी करूनही अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याचे पाहून त्याने रसवंतीचा हंगामी व्यवसाय करण्याचे ठरविले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here