सर्वाधिक गणित विषयक उपक्रम राबवणारे शिक्षक दीपक मधुकर शेटे यांची महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद

0
232

हेरले / प्रतिनिधी:

स्वातंत्र्यसैनिक मा .ग.पाटील आदर्श विद्यानिकेतन मिणचे येथील उपक्रमशील गणित शिक्षक दीपक शेटे हे गणित प्रेमी विद्यार्थी व शिक्षक बनावेत यासाठी स्वतः गणित जगतात असेच म्हणावे लागेल .सर्वाधिक गणित विषयक उपक्रम राबवणारा शिक्षक म्हणून त्यांच्या या उल्लेखनीय कार्याच्या विक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये नुकतीच करण्यात आल्याची अधिकृत घोषणा नुकतीच करण्यात आली आहे .
त्यांनी सुमारे नऊ लाख रुपये खर्च करून जुन्या मापांचा संग्रह जसे की, वजने ,मापे ,तराजू, पट्टी ,मापन साहित्य इत्यादींची समावेश असलेली स्वमालकीची गणित लॅब तयार केली आहे. आधुनिक तंत्रज्ञान व मल्टीमीडिया यांचा वापर करून इयत्ता दहावीचा अभ्यासक्रम अवघ्या दोन पानात आपल्या कल्पकतेने साकारला आहे .सुमारे २५०० तासांच्या कालावधीचा व्हिडिओंचा समावेश असलेल्या LED (Life Edutainment Development ) या विशेष पहिल्या डिजिटल पुस्तकाची निर्मिती केली .वर्गातील बेंचेसना लेखक ,कवी ,शास्त्रज्ञ ,संत, साहित्यिकांची नावे देण्याचा अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविला. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक राज्य आणि राष्ट्रीय पुरस्कारांनी सुद्धा सन्मानित करण्यात आलेले आहे. राज्यस्तरीय कृती संशोधन आणि गणित विज्ञान विषयाचे तज्ञ मार्गदर्शक म्हणूनही त्यांची निवड झाली करत आहे .
त्यांच्या १८ वर्षांच्या शैक्षणिक योगदानात शिकवत असलेल्या दहावीच्या वर्गाचा गणित विषयाचा आजपर्यंत १००% निकाल लागलेला आहे. त्यांनी आजवर सर्वाधिक राबवलेल्या गणित विषयक उपक्रम व अन्य विशेष बाबींची दखल घेऊन त्यांच्या विक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड्स मध्ये करण्यात आली असून त्यांना विशेष राष्ट्रीय पुरस्कार २०१९ सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येत आहे. अशी माहिती महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डस या संस्थेचे संस्थापक संपादक आणि डॉ.सुनील दादा पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली. दीपक शेटे यांच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here