कोल्हापूरात ३३०वा छत्रपती संभाजीराजें बलिदान दिन उत्साहात

273

कोल्हापूर: दि. ११ मार्च २०१९ रोजी छत्रपती संभाजीराजेंच्या ३३० व्या बलिदान दिनानिमित्त कोल्हापुरातील रुईकर कॉलनी येथील छत्रपती संभाजीराजे उद्यानात सकाळी ८ वाजता शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने स्वच्छता करुन उद्यानातील स्मारक परिसरामध्ये फुलांची आरास करण्यात आली . त्यानंतर प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजीराजेंच्या मुर्तीस पुजन व पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले सर्वांनी ५ मिनीटे स्तब्ध उभे राहुन छत्रपती संभाजीराजेंना आदरांजली अर्पण केला. अशा प्रकारे शिवशक्ती प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती संभाजीराजेंचा ३३० वा बलिदान दिनी आभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष – साताप्पा कडव , उपाध्यक्ष – योगेश रोकडे, सचिव – अमोल पोवार ,
राजकिरण सावडकर, नगरसेवक सत्यजित कदम ,भाऊ पाटील, संदिप वीर, अक्षय वरेकर, मनोज कोकाटे, प्रशांत जाधव, उदय कामते, सुजित जाधव, कैलाश दुधणकर, सुभाष खोत, बंडु माळी, रुषिकेश शिंगे, कौस्तुभ शिंदे, विशाल चव्हाण, आनंदा भोसले, निलेश पोवार, स्वप्निल पाटील, अक्षय जाधव, स्वयंभुराज पाटील, योगेश देसाई, निलेश ओतारी आदींसह शिवप्रेमी उपस्थित होते.