शरद पवार यांची माढातून माघार

0
281

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माढा लोकसभा मतदारसंघातून लढण्याची घोषणा काही दिवसांपूर्वी केली. पण त्यांनी आता निर्णय बदलला आहे. शरद पवार यांनी माढा मतदारसंघातून उमेदवारी मागे घेतली आहे तसेच आपला नातू पार्थ पवार यांची उमेदवारी जाहीर केली. पार्थ याला मावळ मधून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान शरद पवार यांची निवडणुकीतून माघार म्हणजे लोकसभा निवडणुकीत भाजपाचा पहिला विजय असल्याची पहिली प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. पार्थ याने लोकसभेला उभे राहावं असा आग्रह सगळ्या स्तरातून होत असल्याने तो उमेदवार असल्याचं पवारांनी जाहीर केलं. त्यामुळे पवारांची नवी पिढी आता राजकारणात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here