खुपिरे उपसरपंचपदी सौ. हौसाबाई हराळे

0
115

कुडित्रे (प्रतिनिधी) : खुपिरे (ता. करवीर) येथील उपसरपंचपदी सौ. हौसाबाई कृष्णात हराळे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी अध्यासी अधिकारी सरपंच संजय दा. पाटील होते. ग्रामपंचायतीमध्ये कुंभी कारखान्याचे संचालक संजय पाटील यांची सत्ता आहे. सौ. सुनीता अरविंद पाटील यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिला होता. उपसरपंचदासाठी सौ. हौसाबाई हराळे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर नूतन व मावळत्या उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पं. समिती सदस्य सौ. यशोदा पाटील, तंटामुक्त अध्यक्ष संजय पाटील, माजी सरपंच तानाजी पाटील, ग्रा. पं. सदस्य धोंडीराम सुतार, शारदा कुंभार, सुनीता पाटील, आशाराणी पाटील, जयश्री कांबळे, वनिता भास्कर, अनिता पाटील, दिलीप आयरे तसेच तंटामुक्त उपाध्यक्ष आबासो पाटील, बी. आर. चौगले, संजय कांबळे, पोलिस पाटील सविता गुरव, भिकाजी हराळे, बाजीराव हराळे, ग्रामविकास अधिकारी अशोक पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here