महिलांनी स्वयंरोजगार उपलब्ध करून आत्मनिर्भर बनावे: शुभांगी विश्वजीतराव जाधव

0
365

पाटगांव / वार्ताहर
सध्याच्या स्पर्धेच्या युगात देशाला महासत्तेच्या दिशेने धेऊन जाण्यासाठी महिलांनी एक पाऊल पुढे टाकुन कार्यरत रहावे. त्याचबरोबर स्वयंरोजगाराच्या विविध संधी शोधुन विकासाच्या प्रक्रियेत अग्रभागी रहावे,असे प्रतिपादन राष्ट्रीय काँग्रेसच्या भुदरगड महिला अध्यक्षा सौ.शुभांगी विश्वजीतराव जाधव यांनी केले.त्या विद्या मंदिर

तिरवडे ( ता. भुदरगड ) शाळेत आयोजित केलेल्या जागतिक महिला दिनानिमित्त बोलत होत्या या वेळी सौ जाधव यांनी आज विविध क्षेत्रांत महिला आघाडीवर आहेत. स्वत:ची गुणवत्ता, कार्यक्षमता त्यांनी सिद्ध केली आहे. मात्र, महिलांनाही सर्वोच्च स्थान मिळाले पाहिजे. निर्णायक संस्थांमध्येही महिलांना संधी मिळाली पाहिजे. त्यासाठी महिलांनीही चाकोरीबाहेरचे काम केले पाहिजे,’ असे सांगतानाच भविष्यात भारतीय महिला अधिक सक्षम असतील आणि नवी उंची गाठतील, असे सांगितले

महिलांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येऊन त्याच्या आतील सप्तगुणांना या कार्यकमांनिमित्य वाव देण्यात मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास माजी सभापती यशवंत उर्फ बाबा नांदेकर,सरपंच कुंडलिक सुतार,उपसरपंच विश्वजीतराव जाधव , सुनिता गोजारे , राजश्री सुतार, सुमन सुतार, विमल पाटील, राखी जाधव, दिपिका जाधव, सारिका मोरे सरिता पाटील , संजीवनी सुतार ,मंगल देसाई,ॠषीकेश जाधव शिवाजी पाटील यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य,शिक्षक,विद्यार्थी व गावातील महिला मोठ्या प्रमाणात उपस्थिती होत्या आभार वसंत यादव यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here