महिलांनी आरोग्याची काळजी घ्यावी. – आ. संध्यादेवी कुपेकर

0
42

आजरा (प्रतिनिधी) : महिला ही कुटुंबातील प्रमुख घटक आहे त्यामुळे महिलांनी आपल्या आरोग्याकडे प्रथम लक्ष द्यावे असे प्रतिपादन आ. संध्यादेवी कुपेकर यांनी केले. माहेर हाँस्पिटल आजरा व ग्रामीण रुग्नालय नेसरी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नेसरी येथे मोफत आरोग्य शिबीराच्या उद्घाटनप्रसंगी अध्यस्थानावरुन आम. श्रीमती कुपेकर बोलत होत्या. या शिबीराचे संयोजन माहेर हॉस्पिटलच्या प्रमुख सौ. बेनार्ड गाँडद केले. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनीस , आशा, यांनी महिलांची आरोग्य तपासणी केली. माहेर हाँस्पिटल आजरा च्या प्रमुख डाँ सौ. गाँडद यांनी महिलांना आरोग्याची घ्यावयांची काळजी या विषयी मार्गदर्शन केले. या शिबीराला आजरा, चंदगड, गडहिग्लज विभागातील महिलांनी या शिबीराचा लाभ घेतला. यावेळी डॉ. बी. एफ. गाँडद, डॉ. रिया गाँडद, डॉ. शरयु, डॉ. सुप्रिया मुधाळकर, निलेश, डॉ. सत्यजीत देसाई, ग्रामीण रुग्णालय स्टॉप, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. डॉ. श्री. गाँडद यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here