महाराष्ट्र राज्याचे नेतृत्व करण्याचा मान खानापूर गावाला मिळाला -नाथाजी पाटील

0
155

गारगोटी -प्रतिनिधी
खानापूर गावाने चंद्रकांत दादांच्या रूपाने महाराष्ट्राला अतिशय सक्षम नेतृत्व दिले असुन महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याचा मान खानापूरसारख्या गावाला मिळालाय याचा अभिमान आहे.असे प्रतिपादन भाजपाचे भुदरगड तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले .
खानापूर ता. भुदरगड येथील चंद्रकांत दादा पाटील यांच्या २५/१५ निधीतून मंजूर झालेल्या रस्ता उद्घाटन समारंभप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सौ. अर्चना भोपळे या होत्या तर मौनी विद्यापिठाचे सदस्य अलकेश कांदळकर, माजी सरपंच बी.डी. भोपळे हे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री पाटील पूढे म्हणाले चंद्रकांत दादांनी खानापूरच्या विकासाकडे बारकाईने लक्ष दिले असुन प्रशस्त तळेमाऊली मंदिर, तळेमाऊली रस्ता, अंतरराष्ट्रीय ओजस शाळा, प्रत्येक गल्लीचे रस्ते, स्मशानभुमी, वॉटर एटीएम, बसस्थानक, केशवनाथ मंदिर, बीरदेव मंदिर, अशी कोट्यावधी रुपयांची कामे मार्गी लागली असुन त्याचा परिपाक म्हणून गावचा कायापालट झाला आहे.

यावेळी सरपंच अर्चना भोपळे,बी.डी. भोपळे, शाखाध्यक्ष आनंदा पाटील,राजू पाटील, शामराव मगदूम, माजी सरपंच पांडुरंग मगदूम, साधना रेडेकर, प्रणिता नाईक,उपसरपंच यशवंत कांबळे, अशोक पूजारी, संतोष भोपळे, युवराज नाईक, सुरेश कांबळे, शामराव वारके, मोहन कांबळे, रमेश पाटील, हिमांशू नाईक , संभाजी पाटील, नामदेव गुरव,
संदिप पाटील भिकाजी पाटील आदी उपस्थीत होते. स्वागत ए.डी. कांबळे यांनी आभार आनंदा रेडेकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here