सासूच्या निधनानंतर सूनेची आत्‍महत्‍या ‼*

0
311

कोल्हापूर : सासुबाईंच्या निधनाचे दु:ख सहन न झाल्‍याने सूनेने आत्‍महत्‍या करण्याची दु:खद घटना घडली आहे. कोल्‍हापुरातील बोंद्रेनगरमध्ये आज शनिवारी पहाटे हा प्रकार घडला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. याविषयी मिळालेली माहिती अशी की, सासूबाई मालती लोखंडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. सासूबाईंच्या निधनाचा मोठा धक्‍का त्‍यांच्या सूनबाई शुभांगी संदीप लोखंडे (वय ३९) यांना बसला. या धक्‍क्‍यातून शुभांगी यांनी बंगल्‍याच्या तिसर्‍या मजल्‍यावरून उडी मारून आत्‍महत्‍या केली. या घटनेने लोखंडे कुटूंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here