भारतानं पाकिस्तानचे तीन ड्रोन पाडले

0
330

बीकानेर : भारतानं हेरगिरी करणारं पाकिस्तानचं ड्रोन पाडलं असून त्याचा शोध अद्याप लागलेला नाही. हे ड्रोन कुठं पडलं? याचा आता शोध सुरु आहे. राजस्थानमधील श्रीगंगासागर हिंदूमलकोट सीमारेषेजवळ सकाळी हे ड्रोन पाडलं गेलं आहे. भारतात हेरगिरी करण्यासाठी हे ड्रोन वापरलं गेलं होतं. यावर भारतीय वायु दलानं ही कारवाई केली आहे. पण, वायु दलानं याबद्दल अद्याप काहीही माहिती दिलेली नाही. गोळ्यांचे आवाज ऐकल्यानंतर स्थानिकांमध्ये घबराट पसरली होती. सटे कोनी आणि खातलाबना या गावांजवळ ड्रोन पडलं असावा असा अंदाज आहे. दरम्यान, गावकऱ्यांना याबद्दल काही माहिती मिळाल्यास कळवावी. तसेच संशयास्पद वस्तुला हात लावू नये असं आवाहन लष्करानं केलं आहे. यापूर्वी देखील भारतानं पाकिस्तानचे दोन ड्रोन पाडले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here