कै.आनंदराव पाटील यांचे यांचे सामाजिक,राजकिय व सहकार क्षेञातील कार्य प्रेरणादायी आहे: माजी आमदार के.पी.पाटील

0
240

प्रतिनिधी(निरंजन पाटील)
ग्रामीण भागाच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख आधार असलेली सहकार चळवळ बळकट करुन सामान्य जनतेच्या हितासाठी तळमळीने काम करणारया कै.आनंदराव पाटील यांचे यांचे सामाजिक,राजकिय व सहकार क्षेञातील कार्य प्रेरणादायी आहे,असे प्रतिपादन माजी आमदार के.पी.पाटील यांनी केले.भाेगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष कै.आनंदराव पाटील काैलवकर यांच्या बाराव्या पुण्यतिथी निमित्त काैलव(ता.राधानगरी) येथे झालेल्या कार्यक्रमात ते बाेलत हाेते.अध्यक्षस्थानी भाेगावती कारखान्याचे माजी उपाध्यक्ष एम.आर.पाटील देवाळेकर हाेते. प्रा.आर.बी.पाटील यांनी स्वागत केले.भाेगावती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशिल पाटील काैलवकर यांनी प्रास्ताविक केले.माजी आमदार पाटील व भाेगावतीचे माजी अध्यक्ष सदाशिवराव चरापले यांचे हस्ते कै.पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन झाले.बी.के.डाेंगळे,सुशिल पाटील काैलवकर,शामराव चाैगले,उपसरपंच स्नेहा पाटील यांची भाषणे झाली.गुणवंत विद्यार्थी प्रसाद धनवडे,चैञाली चरापले,साक्षी चरापले,शुभम चरापले यांचा सत्कार झाला. यावेळी पुथ्वीराज महाडिक,ओम महाडिक, सदाशिवराव चरापले, चंद्रकांतदादा पाटील काैलवकर केरबा भाऊ पाटील,अशाेकराव पवार पाटील,नामदेव पाटील,जयसिंगराव हुजरे,प्रा.किसन चाैगले,शंकरराव डाेंगळे,डी.बी.पाटील,विश्वास पाटील,प्रा.पांडुरंग डाेंगळे,संजय डाेंगळे,धनाजी पाटील काेदवडेकर,वसंतराव पाटील कंथेवाडीकर,एकनाथ पाटील,रघुनाथ जाधव,पांडुरंग भांदिगरे,राजेंद्र पाटील,दिलीप चाैगले,बंडाेपंत किरुळकर,राजु कवडे, संभाजीराव पाटील, दिपाली पाटील,भरत डाेंगळे,अंबाजी पाटील,श्रीपती पाटील,विश्वास वरुटे,जनार्दन पाटील,रावसाहेब डाेंगळे,आण्णाप्पा चाैगले,चंद्रकांत संकपाळ आदी उपस्थित हाेते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here