चक्रेश्वर मंदिराचे सुशोभीकरणाचे काम ग्रामस्थांनी बंद पाडले

0
296

कोल्हापुर : राधानगरी तालुक्यातील चक्रेश्वरवाडी येथील चक्रेश्वर मंदिराच्या सुशोभीकरणासाठी शासनाकडून २ कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. यातील ८२ लाखाच्या कामाची सुरवात झाली असून ठेकेदाराने मनमानी पद्धतीने काम सुरु केले असून मंदिर परिसरात फारशी घालण्याऐवजी पेव्हिंग ब्लॉक घालण्याचा घाट घातला असून ग्रामस्थांनी त्याला विरोध केला आहे. मंदिराचे पवित्र राखण्यासाठी आणि भाविकांना त्रास होऊ नये यासाठी फरशीच घालावी अन्यथा काम सुरु करू देणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. पहिल्या टप्यातील सुशोभीकरणाचे काम ठेकेदाराने सुरु केले आहे. मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ग्रामस्थांनी गुरुवारी बंद पाडले. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी या कामाची चौकशी करावी आणि चांगल्या दर्जाचे काम करावे अन्यथा काम सुरु करू देणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यासंदर्भात गुरुवारी ग्रामस्थ मंदिराशेजारी जमले असताना तांदमुक्त अध्यक्षानीच वाद घातला ज्यांनी गावातील तंटे मिटवायचे त्यानीच वाद घालणे चुकीचे आहे यामुळे गाव तंटामुक्त कसा होणार असा सवाल ग्रामस्थांनी केला. तहसीलदार आणि पोलीस निरीक्षकांनी याकडे लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली. यासंदर्भात उपसरपंच म्हणाले, ठेकेदाराचे काम आम्हाला पसंद नाही मंदिराशेजारी गटारी घालण्या अगोदरच पेव्हिंग ब्लॉक घालण्याचे काम सुरु आहे. हि कामाची पद्धत चुकीची आहे. पेव्हिंग ब्लॉक घालून मंदिराची विद्रुपीकरण करू नये तर दगडी फरशीच घालावी असही त्यांनी सांगितलं. युवराज कुसाळे म्हणाले, यामुळे मंदिर परिसरात सांडपाणी येत आहे. संरक्षण भिंतीला तडे गेले आहेत. गाभाऱ्यातील पाणी बाहेर जाण्याची व्यवस्था केलेली नाही. मंदीराचं महात्म्य टिकवणे गरजेचं आहे भाविकांना कोणताही त्रास होणार नाही याही काळजी घेणे गरजेचं आहे. तर येथील शौचालयासाठी आठ लाख रुपये खर्च झालं असल्याचं त्यांनी सांगितलं. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here