जम्मूतल्या ग्रेनेड हल्ल्यामागे ‘हिजबुल मुजाहीद्दीन’चा हात

0
123

जम्मू : जम्मूतला ग्रेनेड हल्ला हा दहशतवादी हल्ला असल्याचं स्पष्ट झालं आहे. ‘हिजबुल मुजाहीद्दीन’ या दहशतवादी संघटनेने हा हल्ला घडवून आणला आहे. हिजबुलचा दहशतवादी फारुख अहमद भट उर्फ ओमर याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे अशी माहिती पोलीस महासंचालक मनिष सिन्हा यांनी दिली आहे. भट हा ‘हिजबुल मुजाहीद्दीन’चा कुलमर्थ जिल्ह्याचा कमांडर आहे अशी माहितीही त्यांनी दिली. जम्मूमधील बस स्थानकावर झालेल्या ग्रेनेड हल्ल्या प्रकरणा एकाला अटक करण्यात आली होती. या अटकेची माहिती राज्याचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी दिली आहे. घटना घडल्यानंतर काही तासातच पोलिसांनी ही कारवाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here