राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार निश्चित?

0
1593

मुंबई : राज ठाकरे यांची मनसे महाआघाडीत सामील होण्याची शक्यता आता जवळपास मावळली आहे. त्यामुळे ईशान्य मुंबईतील जागा राष्ट्रवादीच लढवणार हे आता निश्चित झालं आहे. या मतदारसंघातून संजय दीना पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील, अशी माहिती समोर आली आहे. मनसे आगामी लोकसभा निवडणुकीत महाआघाडीत जाईल, अशी चर्चा होती. तसंच राष्ट्रवादी आपल्या कोट्यातून ईशान्य मुंबईची जागा मनसेला सोडेल, असंही बोललं जात होतं. मात्र मनसे महाआघाडीत सामील होणार नाही, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही दिवसांपूर्वी केलं. त्यानंतर मग राज ठाकरे हे या निवडणुकीत ‘एकला चलो रे’ची भूमिका घेण्याची शक्यता आहे. ईशान्य मुंबईतील बूथ अध्यक्षांबरोबर शरद पवार संवाद साधणार आहेत. या लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या तयारीचा आढावा यावेळी शरद पवार आपल्या कार्यकर्त्यांकडून घेतील. मनसेनंतर आता प्रकाश आंबेडकर हेदेखील आघाडीपासून दूर होताना दिसत आहे. प्रकाश आंबेडकर यांची काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडीची चर्चा ट्रॅकवर येत नसल्याचं चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here