लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होणार नाहीत : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
278

मुंबई : लोकसभा निवडणुकीबरोबर विधानसभा निवडणुका देखील एकत्र होण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावली लोकसभेसोबत विधानसभा निवडणुका होणार नाहीत. त्या नियोजित वेळीच होतील असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र होण्याच्या शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे. या आधी दोनही निवडणुका एकत्र घेण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. विधानसभा बरखास्तीचा प्रस्ताव शुक्रवारच्या कॅबिनेटच्या बैठकीमध्ये आणला जाण्याची शक्यता होती. अर्जून खोतकर आणि रावसाहेब दानवेंच्या वादाचं निमित्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मातोश्री’वर जात उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं बोललं जात होतं. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र झाल्यास त्याचा फायदा शिवसेना – भाजप युतीला होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकत्र घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपा आग्रही असतील. दरम्यान, शिवसेना – भाजपनं लोकसभा आणि विधानसभेसाठी युती केली असून लोकसभेच्या 25 जागांवर भाजप तर 23 जागांवर शिवसेना लढणार आहे. विधानसभेसाठी देखील 50 -50चा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे. यापूर्वी मात्र देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीच्या वेळी विधानसभेच्या निवडणुका होणार नाहीत. सरकार आपला पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल अशी माहिती दिली होती. पण, आता उद्धव ठाकरे यांच्या भेटीनंतरच निर्णय होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here