मनसे लोकसभा लढणार नाही विधानसभेत रस ?

0
304

मुंबई :

लोकसभा निवडणुकीबाबत मी 9 मार्च रोजी भूमिका जाहीर करेन’ अशी भूमिका मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केली होती. पण, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मनसे उतरणार नसल्याचं आता बोललं जात आहे. कारण, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये मनसेनं लोकसभेसाठी एकही जागा मागितली नसल्याची माहिती आता समोर येत आहे. दरम्यान, लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा मनसेला विधानसभेसाठी अधिक रस आहे. मनसेनं सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानं काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीमध्ये मनसे सामील होणार का? अशी चर्चा होती. पण, त्याबाबत अद्याप तरी काहीही स्पष्ट झालेलं नाही. शिवाय, काँग्रेसनं मनसेला सोबत घेण्यासाठी विरोध दर्शवला होता. पण, राष्ट्रवादी काँग्रेस मात्र मनसेबाबत आग्रही होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here