शिवाजीनगर येथे महाशिवरात्री उत्सव उत्साहात

0
90

कोल्हापूर : सालाबादप्रमाणे शिवाजीनगर येथे महाशिवरात्री उत्सव २१ पिंडी महादेव मंदिरात भक्तिमय वातावरणात पार पडला.सोमवारी पहाटे ४ वाजता रुद्राभिषेक घालण्यात आला. मंदिराचे पुजारी गणेश जंगम यांनी रंगीत अक्षतांनी सुंदर पूजा बांधली होती.
संध्याकाळी ६ वाजता भजन व कीर्तन, ७ वाजता आरती,१० वाजता शिवलीला ग्रंथ पारायणअसे कार्यक्रम झाले. शिवाजीनगर मंडळाच्या सर्व सभासदांच्या हस्ते सोमवारी रात्री १२ वाजता ५२ पात्री अभिषेक ,महाआरती करण्यात आली. रविवार दिनांक १० मार्च रोजी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here