रोजगार , 15 लाख गायब आणि आता राफेल फाईल गायब :राहुल गांधी

0
28

नवी दिल्ली :
राफेल करारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राफेल प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राहुल गांधी यांनी केली. गुरुवारी (7 मार्च) राहुल गांधी यांनी राफेल कराराच्या हरवलेल्या फाईलसंदर्भात पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर चौफेर टीका केली.

राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत म्हटलं की, ‘गायब झाले आहे’, ही नवीन ओळ सरकारने शोधून काढली आहे. रोजगार गायब, 15 लाख रूपये गायब आणि आता राफेलची फाईलदेखील गायब झाली आहे.

राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींवर थेट हल्लाबोल करत म्हटलं की, ‘हे सर्व प्रयत्न चौकीदाराला वाचवण्यासाठी केले जात आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here