सर्व विरोधक मला एकत्र येऊन लक्ष करत आहेत: नरेंद मोदी

0
233

नवी दिल्लीः पाकिस्तानातील दहशतवादी तळावर केलेल्या हवाई हल्ल्याचे पुरावे मागणाऱ्या विरोधी पक्षांना मोदींनी पुन्हा एकदा खडेबोल सुनावले. हवाई हल्ल्यामध्ये नेमके किती दहशतवादी ठार झाले, त्यावरुन सध्या जोरदार राजकारण सुरु आहे.
मी दहशतवादी संघटनांवर हल्ला करतोय तर विरोधक माझ्यावर हल्ला करत आहेत. सर्व विरोधक एकत्र येऊन मला लक्ष्य करत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

गुजरातमधल्या वस्त्राल येथील सभेत बोलताना मोदी म्हणाले, ‘विरोधकांनी मला लक्ष्य केले आहे. त्यांना मोदी नको आहे तर मला भ्रष्टाचार नको आहे. ते मोदींवर हल्ला करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here