जयसिंगपूर चे अभिजित भिसे यांना समाजभूषण रत्न पुरस्कार

0
59

जयसिंगपूर /प्रतिनिधी
हातकणंगले येथील श्रीमंत उदयनराजे भोसले युवा मंंच यांच्या मार्फत शिव जयंती निमित्त देण्यात येणारा सन 2019 चा समाज भूषण रत्न पुरस्कार जयसिंगपूरचे गोंधळी समाजाचे युवा कार्यकर्ते अभिजित दिलिप भिसे यांना देण्यात आला.सदर पुरस्कार राजे लघुजीराव जाधव यांचे थेट 16 वे वंशज शिवाजी राजे जाधव व सर् सेनापती जीवाजी महाले यांचेप्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला .
या वेळी संतोषराजे महाले (सरसेनापती जिवाजी महाले सरसेनापती सिध्दार्थराजे कंक (सरसेनापती येसाजी कंक यांचे 14 वे वंशज) मा.सरसेनापती रणधीरराजे जेधे (कन्होजी जेधे सरसेनापती यांचे थेट 13 वे वंशज) मा.सरसेनापती शितलताई मालुसरे (सरसेनापती तानाजी मालुसरे यांचे थेट 13 वे वंशज) मा.अदित्यसिंह निकम-सरकार ( रामोजी निकम यांचे थेट 16 वे वंशज-सरदार) मा.निलराजे अमात्य पंत (छत्रपती शिवरायांचे कारभारांचे अर्थमंत्री रामचंद्र पंत अमात्य यांचे थेट 13 वे वंशज) मा.धोडींराम केसरकर (वीर ओत्याजी केसरकर यांचे थेट 9 वे वंशज)रवी जावळे (मा.नगरसेवक ईचलकरंजी).नितिन लायकर (उधोगपती.ईचलकरंजी) .महावीर चंदनशिवे.विकासराजे भोसले व श्रीमंत उदयनराजे भोसले युवा मंच.हातकणंगले.व जयसिंगपुर गोंधळी जोशी वासुदेव बागडी समाजाचे समाज बांधव व सर्व सभासद-सदस्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here