सकल मराठा समाजाच्या वतीने मौनी विद्यापीठ संचालकांना निवेदन, उपोषणाचा इशारा

0
686

गारगोटी -प्रतिनिधी
मौनी विद्यापीठ गारगोटी येथील संयुक्त प्रशिक्षण केंद्र गारगोटी येथील केंद्राकडे प्राचार्य पद खुले आरक्षित असताना यापदावर मराठा समाजातील व्यक्तीला वगळून इतर समाजातील उमेदवाराला संधी दिली आहे यामुळे मराठा समाजातील उमेदवारांवर अन्याय झाला आहे .वारंवार मौनी विध्यापिठ संचालकांना निवेदन दिली आहेत तरी त्यांनी काही कारवाई केली नाही विध्यापिठ चे अध्यक्ष आमदार सतेज पाटील,चेअरमन आशिष कोरगावकर यांना या निवेदन विषयी माहिती संचालकांनी दिली नाही .
सकल मराठा समाजाच्या वतीने आज मौनी विध्यापिठ संचालक प्रा.बेलेकर सर यांना निवेदन देण्यात आले.यावेळी 12- 3- 2019 पर्यत या पदावर मराठा समाजातील उमेदवाराची निवड करावी अन्यथा 13 तारीख बुधवार गारगोटी तहसील कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आले .यावेळी मौनी विध्यापिठ शासकीय प्रतिनिधी अलकेश कांदळकर,संचालक मधुकर देसाई,मौनी विध्यापिठ कर्मचारी प्रतिनिधी खोत सर उपस्थित होते .निवेदनावर भुदरगड सकल मराठा समाजाचे अध्यक्ष नंदकुमार शिंदे,प्रहार संघटनेचे अध्यक्ष मच्छिद्र मुगडे,भाजप शहर अध्यक्ष राहुल चौगले ,राष्ट्वादी शहर अध्यक्ष शरद मोरे, मराठा महासंघाचे अध्यक्ष संग्राम पोफळे,शिवसेना तालुका प्रमुख अविनाश शिंदे,सामाजिक कार्यकर्ते शशिकांत पाटील,तुकाराम देसाई,प्रताप चौगले,भीमराव गुंड, गणेश सुतार आदी च्या सह्या आहेत .निवेदनाच्या प्रति तहसील भुदरगड पोलीस स्टेशन,प्राताधिकारी भुदरगड यांना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here