ग्रामीण भागाचा विकास झाल्यास देशाचा विकास होईल: खासदार युवराज संभाजीराजे छ्त्रपती

0
160

गारगोटी-प्रतिनिधी
ग्रामीण भागातील दुर्गम खेडयांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल हा ध्यास घेऊन विकासकामात कोणतेही राजकारण न आणता विकासकामे करत राहणार आहे.मात्र आमच्याही छत्रपती घरण्याच्या पाठीशी आपले प्रेम राहावे. असे प्रतिपादन राज्यसभेचे राष्ट्रपती नियुक्त खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी केले. ते करडवाडी (ता. भुदरगड) येथे खासदार फंडातुन मंजूर झालेल्या अर्तगत रस्ते डांबरीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात बोलत होते .
खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती यांंनी १० लाख निधीचा फंड दिल्याबद्दल लोकनियुक्त सरपंच रंजना सदाशिव बेलेकर यांंनी केेले सत्कार केला.प्रास्ताविक प्रकाश बेलेकर यांनी केले त्यांंनी गावच्या वतीने अनेक वर्षांपासून प्रलंंबीत विकास कामांंचा पाढा खासदार यांंच्या पुुढे वाचुन दाखवला या मध्ये करडवाडी ते मडुर रस्त्याचे डांबरीकरण करणे, विठ्ल मंदिरच्या मागील असणाऱ्या ओढ्यावर बांधरा बांधणे, मराठी शाळेची दुरुस्ती करणे, व्यायाम शाळेत साहित्य मिळावे आदी मागण्या केल्या यावर खासदार युवराज संभाजीराजे छत्रपती म्हणालेे की आपण केलेल्या मागण्या रास्त असून दुर्गम भागाचा विकास करण्याचा आपला संकल्प आहे . आपण केलेल्या मागण्या मी शक्य तितक्या लवकर पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे .मात्र येथून पुढच्या काळात आपले ही छत्रपती घरण्यावर प्रेम राहू दया अशी त्यांंनी विनंती केली
यावेळी शामराव खतकर, सदाशिव बेलेकर, विलासराव बेलेकर, बजरंग सुतार, संभाजी खतकर,महादेव बेलेकर, सुप्रिया खतकर, शुभांगी खतकर, शोभा सुतार, महादेव पाटील,आदीसह ग्रामस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी आभार ग्रामसेवक रमेश लोकरे यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here