सर्जेराव सुतार यांना जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक विशेष पुरस्कार

0
359

कोल्हापूर:
केंद्र शाळा सडोली खालसाचे उपक्रमशील अध्यापक श्री सर्जेराव कृष्णात सुतार यांना कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या वतीने दिला जाणारा सन 2018-19 चा जिल्हा आदर्श विशेष पुरस्कार राज्याचे कृषी व पणन मंत्री ना. सदाभाऊ खोत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला .शिक्षकांनी शैक्षणिक कार्याबरोबरच सामाजिक कार्याची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे असल्याचे मत नामदार सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केले.
यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समितीचे सभापती अमरीशसिंह घाटगे, पक्षप्रतोद विजय भोजे, नाईक निंबाळकर तसेच जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवदास ,रविकांत अडसूळ वित्त विभाग अधिकारी राहुल कदम ,प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे विस्तार अधिकारी ,गटशिक्षणाधिकारी,शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here