शौर्य कोणी दाखवलं, त्याग कोणी केला आणी छाती कोण दाखवतंय:शरद पवार

0
308

नाशिक : शौर्य कोणी दाखवलं, त्याग कोणी केला आणी छाती कोण दाखवतंय असे म्हणत शरद पवार यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला. जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे राजकारण करण्यासाठी वापर केला जात असल्याचे शरद पवार म्हणाले.येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. देशावर हल्ला झाला त्यावरुन राजकारण करणार नाही. दहशतवाद्यांचा बिमोड करण्यासाठी सुदैवाने पंतप्रधानांनी लष्कराला मोकळीक दिली असे शरद पवार यांनी सांगितले.
जवानांनी एअर स्ट्राईक करून जगात भारताची प्रतिष्ठा वाढवली, मात्र सरकार याचा राजकीय फायदा घेत आहे. भाजप नेत्यांनी हा किळसवाणा प्रकार थांबवावा असा सल्लाही शरद पवार यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here