आजरा येथे भाजपची विजयी संकल्प रॅली उत्साहात.

0
378

आजरा. ता. ( संभाजी जाधव.) आजरा येथे भाजपची विजयी संकल्प रॅली काढण्यात आली. संपुर्ण देशभर रविवार दि ३ रोजी भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील विजयी संकल्प रँली दुपारी १२ वा. काढण्याचे अयोजन करण्यात आले होते. हि संकल्प रँली आजरा पंचायत समिती पासुंन तालुका अध्यक्ष अरुन देसाई यांच्या नेतृत्वाखाली सुरवात झाली. रँली साळगाव, सोहाळे, सुलगाव. पेरणोली, मुरुडे, बुरुडे, पोळगाव, कासारकाडगाव, सह तालुक्यातील प्रमुख गावातुन भाजपचा जयजयकार करत मोटरसायकल रँली काढुन, आनंद उत्सव व प्रबोधन करण्यात आले. यावेळी नगरसेवक आनंदा कुंभार, सौ. सुभंदा जोशी, कारखाना संचालक मलिक बुरुड, प्रा. सुंधीर मुंज, सरचिटनिस नाथ देसाई, जयसिंग शेदरकर, सुरेश कुंभार, किरण केसरकर, तसेच तालुक्यातील प्रमुख पदअधिकारी, युवा मोर्चाचे पदअधिकारी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here