बसुदेव धनगरवाडा येथे स्वातंत्र्यपूर्व काळानंतर प्रथमच दुर्गम वस्तीमध्ये जीवनदादा पाटील फंडातून रस्त्याचे उद्घाटन

0
786

गारगोटी -प्रतिनिधी
भुदरगड तालुक्यातील मिणचे बुद्रुक या ग्रुप ग्रामपंचायत मधील दुर्गम बसुदेव धनगरवाडा आहे या धनगरवाड्यावर भारत देश स्वातंत्र झाल्या पासून या वाड्यावर रस्ता नसल्यामुळे येथील नागरिकांना 2 ते 3 किलोमीटर पायपीठ करावी लागत होती .यासाठी आकुर्डे जी व मतदार संघातील तरुण तडफदार जी प सदस्य जीवनदादा पाटील यांनी याची दखल घेऊन येथील रस्त्यासाठी 5 लाखाचा निधी उपलब्ध करून दिला या कामाचे उद्घाटन या वाड्यावरील सर्व ग्रामस्थांच्या उपस्थित करण्यात आले.यावेळी जी प सदस्य जीवनदादा पाटील म्हणाले माझ्या मतदार संघ वाड्यावस्त्यावर विखुरलेला आहे या वाड्यावस्त्यावर निधी कमी पडू देणार नाही सर्वांनी मला विधानसभा निवडणुकीसाठी ताकत द्यावी असे आवाहन केले .यावेळी लोकनियुक्त सरपंच सचिन गुरव,म्हणाले मिणचे खोरीतील मतदार आपल्याला उंचाकी मतदान आपल्या कामाची दखल घेऊन दिल्याशिवाय राहणार नाहीत अशी ग्वाही दिली .यावेळी प्रमुख उपस्थित रमेश देसाई गारगोटी,संजय घरपणकर आंबवणे, चंद्रकांत मोरस्कर ,तानाजी बाजारी, बापू कोलापट्टे,सिद्धराम येमकर,सुनील भारमल,पी एस हळदकर,सुरेंद्र धोंगडे,विष्णू ताम्हणकर, गणपती कांबळे,युवराज कांबळे,विशाल गुरव, योगेश कांबळे,आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here