जयसिंगपूर शहरातील अवैध्य धंदे बंद आहेत का , सिंघम कारवाईला ब्रेक

0
345

जयसिंगपूर:
शहरातील वाहतुकीच्या प्रमुख समस्येसह शहरातील अवैध धंदे खरंच बंद आहेत का ?सिंगम कारवाईच्या धडक मोहिमेला ब्रेक का लागला.शहरात पुन्हा जैसे थे परिस्थितीला प्रारंभ झाल्याने असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे .
जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांची दोन महिन्यांपूर्वी हुपरीहून जयसिंगपूर येथे बदली झाली हुपरी सारख्या छोट्या गावात अनेक समस्यां मार्गी लावत अवैध धंदे बंद करून संपूर्ण गावात अल्पकालावधीत मोठा नावलौकिक कमावला होता .त्यानंतर साहयक पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांना जयसिंगपूर शहराची जबाबदारी देण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे यांनी कोणत्याही राजकीय सामाजिक पुढार्यांना कार्यकर्त्यांना न जुमानता कारवाईस प्रारंभ केला.यामध्ये सुरुवातीच्या काळात शिरोऴ वाडी रोडसह अनेक अंतर्गत रस्त्यांवरील बेशिस्तपणे पार्किंग होणाऱ्या वाहनांच्यावर स्वतः कारवाई केली .शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर पट्टे मारले .टिबल सीट, विनापरवाना वाहन चालवणे ,बेशिस्त पणे वाहने पार्किंग करणे यासह मटका, जुगार ,गुटखा विक्री ,ओपन बार बंद करण्याकरिता यशस्वी प्रयत्न केले .कोणत्याही राजकीय सामाजिक पुढाऱ्याला कार्यकर्त्याला न जुमानता सुरू केलेल्या या कारवाईमुळे बेशिस्तपणे पार्किंग करणाऱ्या वाहनधारकांसह अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले होते .तर दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना या सिंघम कारवाईच्या धडक मोहिमेमुळे समाधान व्यक्त होत होते .रोडरोमियोंना ही चांगलाच चाप बसला होता .
मात्र गेल्या महिनाभरापासून शहरात जैसे ती परिस्थिती निर्माण होत आहे .पुन्हा बेशिस्तपणे वाहन पार्किंग होत आहेत .ठिकठिकाणी मटका जुगार सारख्या अवैद्य धंद्यांना प्रारंभ झाला आहे .काही ठिकाणी ओपन बारलाही उधाण आलेले दिसून येत आहे .दिवसातून दोन वेळा स्वतः सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे हे शहरातील प्रमुख मार्गावरून वाहतुकीच्या शिस्तीसाठी पोलीस व्हॅनमधून सायरन वाजवत आणि सूचना देत फिरत होते . यामुळे शहरात चांगली शिस्त लागली होती .महिनाभरापासून या सिंघम कारवाईला अचानकपणे ब्रेक लागला आहे .
यामुळे शहरात पुन्हा जैसे थे परिस्थिती निर्माण होऊन संपूर्ण शहर विस्कळीत होऊ लागले आहे .राजकीय आणि सामाजिक पुढाऱ्यांना न जुमानता सुरू केलेली ही सिंघम मोहिमेला अचानक ब्रेक का लागला ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे .यामुळे शहरात सध्या खरंच अवैध धंदे बंद आहेत की काय ?असा प्रश्न उपस्थित होत आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here