विरासत सोशल फौडेशनचे संत तुकाराम महाराज परिवर्तन प्रेरणा पुरस्कार प्रेरणा देतील : प्रा.शहाजी कांबळे

0
226

गोकुळ शिरगाव :प्रतिनिधी
                संत तुकाराम महाराज परिवर्तन प्रेरणा पुरस्कार समाजाच्यासाठी सेवाभावी कार्य करणा-या व्यक्ती व संस्थांना प्रेरणादायी ठरतील असे मत रिपब्लिकन पार्टी ऑफ  इंडिया( ए) जिल्हा कोल्हापुरचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा.शहाजी कांबळे यांनी केले.
          तामगाव ता.करवीर येथील विरासत सोशल फौडेशन यासंस्थेच्या वतीने विविध क्षेत्राातील व्यक्ती व संस्थांना पुरस्कार वितरण समारंभ प्रंसगी ते बोलत होते.तामगाव येथे तुकाराम बीज उत्सव दरवर्षी मोठया प्रमाणात साजरा होतो.संत तुकाराम महाराज व गाडगे  महाराज, शाहू,  फुले, आंबेडकर, शिवाजी महाराज,यांची प्रेरणा घेऊन या संस्थेने तळागाळातील गोरगरिबांच्यासाठी काम करणा-या व्यक्तीना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र  देऊन गौरवले .

        तामगावसाठी मराठी शाळेला योगदान देणारे सेवानिवॄत शिक्षक शंकर भोई,भास्कर कांबळे,पाडूरंग वडडर,जयश्री भोई,दतात्रय नलवडे, एचआयव्ही /एड्स प्रबोधन करणारे मोहन सातपुते,केरळ नैसर्गिक आपतीमध्ये काम करणारे पदमराज रांगोळे,यांच्यासह अमरसिंह जगदाळे ,श्रमयोगी प्रतिष्ठान खोची,देशसेवा करणारे सैनिक उमेश गंगाधर,विनायक पुजारी,तर डॉ.पवन गायकवाड,दामोदर गवळी,उषा गंवडी ,रमेश वर्धन ,दता मिसाळ ,सुमित  साळुंखे,यांना सेवाभावी कार्यासाठी संत तुकाराम महाराज  परिवर्तन प्रेरणा पुरस्कार देऊन गौरवविण्यात आले.

या कार्यक्रमासाठी रूपाताई  वायदंडे , सतिश माळगे, प्रदिप ढाले ,कुंडलिक कांबळे, दिलिप कोथळीकर, बाजीराव जैताळकर, प्रविण आजरेकर यांची उपस्थिती होती.प्रास्ताविक फौडेशनचे अध्यक्ष विश्वास तरटे,स्वागत मंदन ढोबळे,आभार डांगरे सर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here