भेसळ करणार्यांना कोल्हापूर मिसळीची चव काय कळणार :संजय मंडलिक

0
711

गारगोटी प्रतिनिधी – विकासकामांचे खोटे डिजिटल बोर्ड लावून कोल्हापूरच्या जनतेला फसविणाऱ्या आयुष्यभर भेसळ करनाऱ्यांना कोल्हापुरी मिसळची चव काय कळणार असे उद्गार शिवसेना-भाजपचे उमेदवार प्रा.संजयदादा मंडलिक यांनी केले.ते वाघापूर ता.भुदरगड येथील आम. प्रकाश आबीटकर यांच्या विकासकामांच्या उद्धाटन प्रसंगी बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिलीप कुरडे होते.
मंडलिक पुढे म्हणाले ज्या ज्या गावामध्ये आम्ही उद्घाटनाला जातो त्या ठिकाणी गेल्या पाच वर्षात एकही रुपयचा विकास निधी खासदारांकडून मिळाला नसल्याचे बोलले जाते.यावेळी आमदार आबीटकर म्हणाले राधानगरी विधानसभा मतदार संघातून प्रचंड मताधिक्य संजय मंडलिक यांना देऊ,दिवंगत लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांच्या कामाची पोहोच पावती म्हणून संपूर्ण जनता मंडलिकांच्या पाठीशी ठाम राहील.
सचिन घोरपडे म्हणाले आम. सतेज पाटील यांच्या आदेशानुसार संजय मंडलिक यांना काँग्रेसचा पाठिंबा राहील.मंडलिकसाहेबानी सर्व सामान्य माणसाला नेतृत्व देण्याचे काम केले
या कार्यक्रमासाठी सभापती स्नेहल परीट, नंदकुमार ढेंगे, दत्ताजीराव उगले,नगराध्यक्ष राजेखान जमादार,ज्ञानदेव दाभोळे,उपसरपंच बाजीराव जठार,मदन देसाई,मधुकर भोई, बी.एस जठार,किसन जठार,सागर दाभोळे,रावजी बरकाळे,धोंडीराम दरेकर,सतपाल आरडे,उपस्थित होते.
यावेळी गावातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.स्वागत सुनील जठार प्रास्ताविक समाधान दाभोळे, व आभार युवराज आरडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here