चोपडेवाडी ता.भुदरगड येथे आरसीसी गटर्स कामाचा शुभारंभ

0
549

गारगोटी -प्रतिनिधी
ग्रामीण खेडयांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल हा ध्यास घेऊन कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत दादांची घोडदौड चालू असून विकासकामात कोणतेही राजकारण न आणता कार्य करावे या दादांच्या शिकवणीवरच आमची वाटचाल सुरु आहे असे प्रतिपादन भाजपाचे भुदरगड तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले.
चोपडेवाडी ता. भुदरगड येथे खनिकर्म विभागाकडून मंजूर झालेल्या आरसीसी गटर्स कामाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते . अध्यक्षस्थानी उपसरपंच सौ. योगिता धनाजी चोपडे या होत्या तर प्रमूख पाहूणे म्हणून मौनी विद्यापिठाचे शासन नियूक्त प्रतिनिधी अलकेश कांदळकर , किसान आघाडीचे जिल्हाध्यक्ष योगेश परुळेकर, कोजिमाशिचे संचालक प्रा. हिंदूराव पाटील हे होते.
यावेळी बोलताना श्री. पाटील पूढे म्हणाले भूदरगड तालूक्याचे भुमीपूत्र म्हणून चंद्रकांत दादांचे या तालुक्यावर विशेष लक्ष असल्यामुळे आपल्या तालूक्याला सर्वाधिक निधी प्राप्त होत आहे. त्यामूळे त्यांच्या विचारावर काम करणे म्हणजे आपले भाग्यच आहे.
यावेळी सुनिल तेली, नामदेव चौगले, भगवान शिंदे, संतोष पाटील, गारगोटी शहराध्यक्ष राहूल चौगले,रणजित आडके,रमेश रायजादे, सुरेश सुतार, लखन लोहार, दिपक पाटील, धनाजी चोपडे, सतीश शिवगण, शामराव चोपडे, शिवाजी, रक्ताडे, दूध संस्था चेअरमन रणजित येसादे,दिलीप शिवगण, किरण गुरव,नामदेव शिवगण, अजय चोपडे, मनोहर शिवगण, शंकर चोपडे, आनंदा रब्बे, दिनकर रक्ताडे यांचे सह ग्रामस्थ व महीला मोठ्या संखेने उपस्थित होत्या.
स्वागत अवधूत राणे यांनी केले तर आभार सूर्याजी घावरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here