हवाई हल्ल्यात जैश च्या 4 इमारती जमीनदोस्त ,एसइआर चित्रीकरणा त स्पष्ट

0
609

नवी दिल्ली:
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले. त्यामध्ये मदरसा तालीम-उल-कुराणच्या चार इमारतींचे नुकसान झाले आहे, असे
गुप्तचर यंत्रणांकडे असलेल्या सिंथेटिक अपर्चर रडारच्या (एसएआर) साहाय्याने घेण्यात आलेल्या चित्रीकरणात स्पष्ट झाले आहे.त्यामधील एका इमारतीचा वापर गेस्ट हाऊसप्रमाणे करण्यात येत होता, तेथे मसूद अझरचा भाऊ राहात होता, एल आकाराची एक इमारत होती. तेथे प्रशिक्षण घेणारे दहशतवादी राहात होते, दोन मजल्यांच्या एका इमारतीमध्येही प्रशिक्षण घेणारे दहशतवादी राहात होते, या सर्व इमारतींना लक्ष्य करून उद्ध्वस्त करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here