बसरेवाडी निळपन येथे आमदार फंडातील विविध कामांचे उदघाटन

0
264

गारगोटी प्रतिनिधी : मिणचे खु.परिसरात आमदार प्रकाशराव अबीटकर यांच्या हस्ते विकासकामांचे उदघाटन करण्यात आले. या मध्ये बसरेवाडी येथे बसरेवाडी येथील अंतर्गत ५ लाख रस्त्याचे कामाचे लोकार्पण करण्यात आले त्याच बरोबर विठ्ठल रुखमाई सांस्कृतिक हॉल साठी देण्यात आलेल्या १२ लाख रुपय मंजूर कामाचे उदघाटन आमदार अबीटकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी कालव्यात गेलेल्या जमीन धारकांना निधी मिळवून दिल्या बद्धल बसरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने आमदार प्रकाश अबीटकर यांचा नागरि सत्कार करण्यात आला.यावेळी बसरेवाडी गावचे सरपंच विठ्ठल पाटील,बाबुराव देसाई,पंचायत समिती उपसभापती अजित देसाई,कल्याणराव निकम ,सागर कुंभार सह ग्रामस्थ उपस्थित होते.याच बरोबर निळपन येथे वाडी गल्ली येथील गाव अंतर्गत रस्त्याला ७ लाख निधी मंजूर केला याचे ही आमदार अबीटकर यांच्या वतीने या कामाचे उदघाटन निळपन ग्रामस्थांच्या उपस्थित करण्यात आले या वेळी आमदार फंडातील ब्राह्मण गली येथील काँक्रीट रस्त्याच्या कामाचे लोकार्पण करण्यात आला या वेळी निळपन चे सरपंच,सदस्य,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here