भारतीय जवानांच्या अन्नात विष मिसळण्याचा पाकिस्तानचा कट

0
201

नवी दिल्ली : पाकिस्तान पुन्हा एकदा भारतीय लष्कराविरोधात मोठा कट योजत असल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तान मिलिट्री इंटेलिजन्स (MI)आणि इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स(ISI)भारतीय लष्करातील जवानांच्या जेवणामध्ये विष मिसळण्याचा कट आखत आहेत. यासाठी योजनादेखील आखण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर, गुप्तचर यंत्रणांकडून सर्व लष्करी तळांवरील तसेच जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा दलातील जवानांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. शिवाय, जेवणाचे साहित्य खरेदी करताना सावध राहण्याचे सांगण्यात आले आहे. या इशाऱ्यानंतर गुप्तचर यंत्रणांकडून जवानांसाठी असणाऱ्या अन्न-धान्य गोदामांची सुरक्षा वाढवण्याचा आदेश देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here