खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा खासदार बनवण्यासाठी जीवाचं रान करू- माजी आमदार के पी पाटील

0
823

गारगोटी -नितीन बोटे

भुदरगड तालुक्यातील गारगोटी इथल्या पोलीस परेड मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं महिला मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याला महिलांनी प्रचंड गर्दी केली होती.यावेळी बोलताना भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांनी खासदार धनंजय महाडिक यांनी महिलांसाठी अनेक उपक्रम राबवले असून कोल्हापूर जिल्ह्यातील महिला खासदार धनंजय महाडिक यांना पुन्हा एकदा खासदार बनवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं सांगितलं. खासदार धनंजय महाडिक म्हणाले,संसदेमध्ये कोल्हापूर जिल्ह्याचे अनेक प्रलंबित प्रश्न प्रभावीपणे मांडून ते सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला आहे. माझं काम हीच माझी ओळख बनली असून; या कामाच्या बळावरच मी पुन्हा विजयी होईन याची मला खात्री आहे.यावेळी बोलताना माजी आमदार के पी पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांचं भरभरून कौतुक केलं.आदर्श खासदार कसा असावा याचा मापदंड खासदार धनंजय महाडिक यांनी घालून दिला आहे.त्यांच्या रूपानं कोल्हापूर जिल्ह्याला जणू परिसच सापडला आहे अशा शब्दात माजी आमदार के पी पाटील यांनी खासदार धनंजय महाडिक यांचा गौरव केला.
धनंजय महाडिक यांचा विजय ही आता सर्वांची जबाबदारी आहे असं प्रतिपादन के पी पाटील यांनी केलं.
या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार,नयना कलकुटकी, वृषाली देसाई,बाळ देसाई, बिद्रीचे संचालक मधुकर देसाई,पंडितराव केणे, सुनील कांबळे,विलास झोरे,बापू आरडे,धोंडीराम वारके, पंचायत समिती सदस्य संग्राम देसाई,संतोष
मेंगाणे ,युवाशक्तीचे नंदू शिंदे,योगेश शेटे, अमर चव्हाण,अशोक यादव,रेखा पाटील अश्विनी वास्कर, अजित जाधव, प्रवीण आरडे,रूपाली सावंत, ग्रामपंचायत सदस्य स्नेहल कोटकर यांच्यासह हजारो महिला आणि युवती उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here