निवडणूका ठरलेल्या वेळातच होतील, निवडणूक आयोगाचे निर्देश

0
124

मुंबई प्रतिनिधी:

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. त्यात लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने याचा परिणावर निवडणुकांवर होणार असे म्हटले जात होते. पण निवडणूक आयोगाने नुकतेच यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. निवडणूका ठरलेल्या वेळातच होतील असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. देशात सुरू असलेल्या घटनाक्रमावर आयोगाची नजर आहे पण आयोग हा संविधानाच्या नियमांशी देखील बांधील आहे असल्याचे भारताचे निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी सांगितले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील निवडणूकीच्या तयारीची पाहणी केली. यासोबतच राजकिय पक्ष, एजंसीचे नोडल ऑफिसरांची त्यांनी भेट घेतली होती. महाराष्ट्रात एकूण 49,284 मतदान क्षेत्रात एकूण 95,473 मतदान केंद्र बनवले गेले आहेत. महाराष्ट्रात पहिल्यांदाच सर्व वोटींग मशिन वोटर वेरिफाइट पेपर ऑडिट ट्रेलशी जोडले जाणार आहेत. नव्या मतदारांनी लवकरात लवकर स्वत:ची मतदान म्हणून नोंदणी करून घेण्याचे आवाहन आयोगाने केले आहे. राहण्याच्या जागेवरून ज्यांना मतदान नोंदणी करता येत नसेल त्यांना नवे मतदार म्हणून नोंद करण्याची कार्यवाही सुरु केली जाणार आहे. संवेदनशील भागांमधील मतदान केंद्राजवळ पोलीस संरक्षण पुरवले जाणार आहे. मतदानाच्या 48 तास आधी निवडणूक प्रचार थांबवावा अशी मागणी काही राजकीय पक्षांनी केली होती. यासंदर्भात निवडणूक आयोग विचार करत आहे. या व्यतिरिक्त सोशल मीडियावर होणाऱ्या पोस्टवरही निवडणूक आयोगाची नजर असणार आहे. NRI असलेल्यांना ऑनलाईन मतदानाची सुविधा देण्यात येण्याची अफवा असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here