वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान मायदेशी

0
459

नवी दिल्ली : भारतीय वायुसेनेचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना पाकिस्तानने भारताच्या ताब्यात सोपवलं आहे. अवघ्या 55 तासांमध्ये अभिनंदन यांना भारताकडे सोपविण्यात आलं. भारताच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान कृती मानलं जात आहे. भारतासह आंतरराष्ट्रीय दबावासमोर झुकत काल संध्याकाळी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी वर्धमान यांना पुन्हा भारताकडे सोपवण्यास होकार दर्शवला होता.

वाघा बॉर्डरमार्गे अभिनंदन वर्धमान हे मायदेशी परतले आहेत. भारताचा ढाण्या वाघ मायदेशी परतल्यामुळे वाघा बॉर्डरसह देशभरात आनंदाचं वातावरण आहे. अभिनंदन यांचे कुटुंबीयही वाघा बॉर्डरवर उपस्थित आहेत. मायदेशात पाऊल ठेवल्यानंतर भारतीय वायुसेनेच्या ताफ्यातून त्यांना अमृतसर एअर बेसला आणण्यात येईल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here